🌟परभणी शहरात भगवान परशूराम जन्मोत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न : वाद्याविना निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष....!


🌟शोभायात्रेत हजारोंचा सहभाग भारतमातेचा जयघोष व देशभक्तीवर नारे : रणरागिणीच्या पथकाद्वारे सुंदर अशी प्रात्यक्षिके🌟


परभणी
: परभणी महानगरात काल मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ वैशाख शुक्ल द्वितीया रोजी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सकल हिंदू समाजाचे सहावे अवतार भगवान श्री परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो मान्यवरांसह हजारो नागरीक सहभागी होते. युवक आणि युवतींची संख्या लक्षवेधी होती.

            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील मैदानावरुन मंगळवारी सायंकाळी ०७.०० वाजता या शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळावरील हिंदू बांधवांवर अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारासह हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शहीद बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्या पाठोपाठ भगवान श्री परशुरामाच्या प्रतिमेची वेदमुर्ती बाळुगुरु असोलेकर यांच्याहस्ते विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे नंदकुमार परांडकर, योगेश जोशी सोनपेठकर, स्वप्नील पिंगळकर, दिलीप शर्मा, सचिन सरदेशपांडे, पवन शर्मा, दिपक कासांडे, रोहित कनकदंडे, शंकर आजेगांवकर, मंदार कुलकर्णी, विठुगुरु वझुरकर यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. राहुल अंबेगांवकर, डॉ. संजय टाकळकर, डॉ. विकास धर्माधिकारी, डॉ. सागर मसलेकर, डॉ. रवि कुलकर्णी, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. अभय सुभेदार, डॉ. गजानन मार्डीकर, अजय कुलकर्णी, संजय कुलकर्णी, माजी नगरसेवक नवनित पाचपोर, सचिन दैठणकर, संदीप भंडे, अनुप शुक्ला, अरुण ओझा, प्रदीप जोशी, आनंद शांडील्य, मकरंद कुलकर्णी, विश्‍वांभर काठवठे आदी उपस्थित होते.

           या शोभायात्रेत भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. केदार खटींग, शिवसेनेचे नेते आनंद भरोसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक डॉ. रामेश्‍वर नाईक, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक राजेश देशपांडे, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, अनुप शिरडकर, अभिषेक वाकोडकर, मधुसुदन वाकोडकर, भाजपाचे सुनील देशमुख, संजय रिझवानी, माजी नगराध्यक्ष कमल अग्रवाल, अनुप शुक्ला, विलास मामा चांदवडकर, अ‍ॅड. रमेश शर्मा, अ‍ॅड. पवन शर्मा, सुशील शर्मा, मुकुंद विटेकर, दिवाण, राजेश शर्मा, विलास गुरु लिंबेकर, डॉ. दीपक करजगीकर, संतोष पेडगावकर, बंडू जोशी, महेश पाटील, मनोज साखरेकर, संदीप पाठक, वांगे, राजन मानकेश्‍वर, सुरेंद्र मानकेश्‍वर, बाळकृष्ण कापरे, नितीन कोठेकर, अजय हमदापुरकर, सतीश कुलकर्णी, संजय पाठक, प्रमोद बल्लाळ, सचिन सरदेशपांडे, अनिल बल्लाळ, रामदेव ओझा, मुन्ना पारवे, रोहित जगदाळे, दिनेश नरवाडकर, सुनील देशपांडे, शिरीष जयपुरकर, प्रवीण चौधरी, संजय पांडे, डॉ. विनय कुलकर्णी यांच्यासह अन्य मोठ्या संख्येने सहभागी होते. या यात्रेचा समारोप गांधी पार्कातील राजाराम सभागृहासमोर महाआरतीने करण्यात आला. महाआरतीनंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुराम जन्मोत्सव व शोभायात्रा यशस्वी करण्याकरीता संयोजन समितीच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

💫जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ दणाणली :-

          या मैदानापासून वाद्याविना शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शिस्तबध्द पध्दतीने व भारतमातेचा जयघोष करीत निघालेल्या या शोभायात्रेत विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवर सहभागी झाले होते. या मान्यवरांसह हजारो बांधवांनी विशेषतः युवक व युवतींनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय श्री राम’, ‘भगवान श्री परशुराम की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करीत शोभायात्रेचा संपूर्ण मार्ग व मुख्य चौकांसह बाजारपेठ दणाणून सोडली.

💫शोभायात्रेतील महापुरुषांच्या प्रतिमा लक्षवेधी :-

          या शोभायात्रेतील सहभागी महिला-पुरुषांनी आपआपल्या हातामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेचे फलक घेतले होते. हे फलक लक्षवेधी ठरले. शोभायात्रेतील भव्य अशा रथावर भगवान श्री परशुराम यांची भव्य अशी प्रतिमा होती. त्याचे ठिकठिकाणी नागरीकांनी पूजन केले. पुष्पवृष्टी करीत दर्शन घेतले.

💫रणरागिणीच्या पथकाने वेधले लक्ष :-

          या शोभायात्रेचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील रणरागिणी पथकातील महिला, युवतींनी स्वसंरक्षणा संदर्भातील सुंदर अशी प्रात्याक्षिके सादर केली. ‘हे हिंदू नारी तू हो रणरागिणी’ असा फलक घेवून निघालेल्या या रणरागिणींनी काठी, लाठी, कराटे, तलवारबाजी वगैरे स्वसंरक्षणासंदर्भातील एका सरस एक प्रात्याक्षिके सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पथकात सौ. प्रणिता दामोशन, सौ. गौरी धारासूरकर, सौ. मनिषा अंबेकर, सौ. विलासिनी इनामदार, सौ. अर्चना चिक्षे, कु. साची इनामदार, सौ. सुवर्णा पौळ, सौ. क्रांती दैठणकर, कु. दिव्या चौधरी, कु. अर्चना जोशी, सौ. सायली टाकळकर, सौ. माधुरी चौधरी, सौ. भाग्यश्री जोशी, कु. आदीती जोशी, कु. कांचनिका देशमुख, कु. उर्जस्वती देशमुख यांच्यासह अन्य सदस्या सहभागी होत्या. या पथकाने ठिकठिकाणी चौकांमधून केलेल्या या प्रात्यक्षिकामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या