🌟ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स फायर सर्व्हिस वरणगावचे कर्तव्यदक्ष कर्मचारी चंद्रकांत गवळी यांना बेस्ट फायर इंजिन ड्रायव्हर अवार्ड...!


🌟मुख्य महाप्रबंधक एम.झेड.सरवर यांच्या हस्तें कर्तव्यदक्ष कर्मचारी चंद्रकांत गवळी यांना सन्मानचिन्ह प्रदान🌟 

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स फायर सर्व्हिस मधील कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर कर्मचारी चंद्रकांत किसन गवळी यांना नुकताच दि.२१ एप्रिल २०२५ रोजी अग्निशमन सेवा दिवस (fire service day 2025) घ्या पार्श्वभूमीवर ११.०० वाजेच्या सुमारास बेस्ट फायर इंजिन ड्रायव्हर-२०२५ अवार्ड प्रदान करण्यात आला याच कार्यक्रमात बेस्ट फायरमन अवार्ड डी.आर.कोळी,बेस्ट फायरमन अवार्ड के.आर.पाटील, बेस्ट फायरमन अवार्ड एम.आर.कुरेशी,बेस्ट फायरमन अवार्ड एस.एस.वराडे व बेस्ट पेरफॉर्मस क्रू के.पी.पाटील शिफ्ट यांना देखील प्रदान करण्यात आला.


कर्तव्यदक्ष कर्मचारी चंद्रकांत गवळी,डी.आर.कोळी,के.आर.पाटील,एम.आर.कुरेशी,एस.एस.वराडे,के.पी.पाटील यांना सदरील अवार्ड मुख्य महाप्रबंधक एम.झेड.सरवर साहेब यांच्या हस्तें ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव कॉन्फरन्स हॉल येथे प्रदान करण्यात आले ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स फायर सर्व्हिस मधील कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर कर्मचारी चंद्रकांत किसन गवळी यांना बेस्ट फायर इंजिन ड्रायव्हर अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांच्यासह सर्व सन्मानीत कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून त्यांचे मित्र परिवारातून देखील अभिनंदन होत असून हे सर्व अवार्ड फायर डे क्लोजिन सेरीमनीच्या दिवशी प्रदान करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पी पी ठाकूर JWM FB/SF यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री प्रदीप पाटील JWM FB/SF यांनी केले यावेळी महाप्रबंधक सरवर साहेबांचे स्वागत श्री अरुण ठाकूर  साहेब GM यांनी केले ,श्री अरुण ठाकूर साहेबांचे स्वागत श्री एस टी सपकाळे OIC JWM FB/SF यांनी केले....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या