🌟राज्यातील खासगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने खासगी बालवाड्यांना नोंदणी बंधनकारक...!



🌟त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे🌟

पुणे :- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार आता पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश पायाभूत स्तर म्हणून शालेय शिक्षणात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने खासगी बालवाड्यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मध्ये शिक्षणाचा ५+३+३+४ असा आकृतीबंध करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या पाच वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची तीन वर्षे (वयोगट ३ ते ६), तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश आहे. हा पाच वर्षांचा टप्पा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानण्यात आला आहे. त्यानुसार पायाभूत स्तरासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अभ्यासक्रम आराखडाही तयार केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या