🌟राज्यातील दिव्यांगाना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील🌟
मुंबई : राज्यातील दिव्यांगांना आपल्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी सरकारकडून घरकुल योजना राबवण्यात येणार आहे तसेच दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे.
एकूणच जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी सुसंगत नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या सह्याद्री अतिथिगृहात दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
राज्यातील दिव्यांगाना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण,रोजगार व स्वयंरोजगाराच्या सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी देखील विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
💫दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम :-
दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय योजना, सवलती, शिक्षण, नोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीम राबवावी.
0 टिप्पण्या