🌟पुर्णा तालुक्यातील कमलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष रत्नपारखे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित....!


🌟जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील कमलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असणारे संतोष रत्नपारखे यांना जिल्हा परिषद परभणी तर्फे आयोजित नुकत्याच भव्य सोहळ्यात जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्काराने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास, योजना शिक्षणाधिकारी संजय ससाणे, डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, अधिव्याख्याता अनिल जाधव, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, शौकत पठाण, बालाजी कापशीकर यांच्यासहित सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

संतोष रत्नपारखे हे उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जातात. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हास्तरावर दोन वेळेस क्रमांक पटकावले आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचन चळवळीच्या माध्यमातून ते कार्य करत असतात. मुलांसाठी शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून त्याद्वारे अध्यापन करतात. तालुकास्तरावर तसेच केंद्रस्तरावर विविध प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून कामगिरी बजावत असतात. त्यांच्या पुरस्कार प्राप्ती बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या