🌟श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत आज श्रीराम नवमी निमित्त भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन....!

 


🌟या सोहळ्यानिमित्त भाविकांच्या गर्दीने अयोध्या नगरी फुलून जाणार आहे🌟

अयोध्या : उत्तर प्रदेश राज्यातील प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत श्रीराम नवमी निमित्त आज रविवार दि.०६ एप्रिल रोजी भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


या सोहळ्यानिमित्त भाविकांच्या गर्दीने अयोध्या नगरी फुलून जाणार आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरात वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना केल्या असून वाढती उष्णता लक्षात घेऊन भक्तांना ओआरएसची पाकिटे दिली जाणार आहेत. तसेच शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या