🌟विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त 'पुणे करार' या पुस्तकाचे अत्यल्प दरात वितरण......!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे व्यवस्थापक रामराव मुनेश्वर होते🌟 

नांदेड (दि.14 एप्रिल 2025) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर  'पुणे करार' हे पुस्तक अत्यल्प दरात वितरीत करण्यात आले. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे झालेल्या 'पुणे करार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेबाबत स्वतः बाबासाहेब यांनी लिहिलेल्या या पुस्तकात सदरील कराराचे वास्तव मांडण्यात आले आहे. याची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे व्यवस्थापक रामराव मुनेश्वर होते यावळी मारोतराव देगलूरकर,श्याम निलंगेकर,मनिष कावळे,डॉ.दिलीप फुगारे,एड. प्रशांत कोकणे,एड.यशवंत मोरे,प्रा. बाबाराव नरवाडे,पत्रकार रमेश मस्के,सुरेश राठोड,सोपानराव मारकवाड,संजय वाघमारे, लोकेश गोडबोले,जयकुमार डोईबळे,आदी बनसोडे (औरंगाबाद ) काकासाहेब डावरे,यांची प्रमुख  उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित कहाळेकर,जयदीप पैठणे,सम्यक खोसले यांनी परीश्रम घेतले.अनुसूचित जाती जमाती कल्याणकारी संस्थांची राष्ट्रीय परिषद दिल्ली महाराष्ट्र शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या