🌟आर्थिक/मानसिक शोषण असह्य झाल्याने बॅंक व्यवस्थापणाच्या चौकशीची प्रशासकाकडे केली मागणी🌟
नांदेड (दि.०५ एप्रिल २०२५) - नांदेड येथील सम्राट नगर परिसरातील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत सन २०१९ यावर्षी रुजू झालेले लिपीक शाम विश्वनाथ नारायणकर यांची कुठलेही कारण नसतांना मुंबईतील कुर्ला पुर्व स्थित नेहरु नगर अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत बदली करण्यात आली सद्या ते या शाखेत लिपिक पदावर कार्यरत असून त्यांचे या शाखेतील बँक व्यवस्थापनाकडून सातत्याने आर्थिक मानसिक शोषण होत असल्याने त्यांनी बँकेच्या प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन बॅंक व्यवस्थापणाच्या सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आपल्या मुलभूत अधिकाराचे सातत्याने होणारे हणण थांबवण्याची व आपणास योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे.अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक कुर्ला पुर्व नेहरू नगर शाखेतील लिपिक शाम विश्वनाथ नारायणकर यांनी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासनाकडे केलेल्या लेखी तक्रारीत असे नमूद केले आहे की नांदेड येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक व संभाजीनगर येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक शाखेतील कर्मचारी मागील आठ दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्तव्यावर कार्यरत असुन आपली मात्र जाणीवपूर्वक मानसिकदृष्ट्या त्रास देण्याच्या हेतूने वारंवार बदली केल्या जात आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे अगदी तुटपुंजी अल्पशा पगार वाढ करुन कामाच्या वेळेत दिड तासांचा कालावधी नियमबाह्य पद्धतीने वाढवण्यात आला आहे यातून असे निदर्शनास येते की संबंधित अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक शाखा नेहरू नगर पुर्व कुर्ला शाखा व्यवस्थापण माझा जाणीवपूर्वक आर्थिक मानसिक शारीरिक छळ करीत आहे सदरील बाब आपणास असह्य झाल्याने व मान्य नसल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले संबंधित बँक शाखा व्यवस्थापकांनी आपणास बळजबरीने १४ हजार रुपयांची शेअर्स घ्यायला लावली एसटीसीसीची मर्यादा १५०००० ने वाढविल्याने त्याचे व्याज भरावे लागत आसल्याने वरिल समस्येचे निराकरण करण्यात यावे या मागणीसाठी लिपिक शाम विश्वनाथ नारायणकर यांनी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य प्रशासकांकडे लेखी निवेदन १८ फेब्रुवारी व १२ मार्च रोजी देऊनही कोणतीही चौकशी व कार्यवाही न झाल्याने १५ एप्रिल पर्यंत चौकशी न झाल्यास १५ एप्रिल २०२५ रोजी ते नांदेड येथील अशोक नगर शाखेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी २८ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले असून खालील प्रमुख मागण्यांसाठी ते आमरण उपोषणास बसणार आहेत :-
💫लिपिक शाम नारायणकर यांनी मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात प्रशासकांचे खालील बाबींकडे लक्ष वेधले आहे :-
१) तुटपूंजी ८०० रु पगारवाढ आणि वाढिव कामाचा दिड तास तसेच मागिल ८ ते १० वर्षापासून नांदेड आणि संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या बैंक पौलिसीनुसार का झाल्या नाहित.
२) पगारवाढ नाही उलट १०% पगार कपात केली
३) बळजबरीने १४०००० रू चे शेअर घ्यायला लावले, प्रथम वेळा १५००० रू चे आणि द्वितीय वेळा १२५००० रू चे.
४) Staff account (STCC), लिमीट ३००००० रू. ची ४५०००० रू केली.
५) वाढिव ८०० पगारवाढ आणि कामाचा दिड तास वाढवला हा जो करार केला गेला तो आम्हाला विचारतात न घेता / अंधारात ठेऊन केल्या गेला.
६) Increment., interconnectivity, medical LTA ई. Allowance का बंद केले ?
0 टिप्पण्या