(जिल्हा परीषद प्राथमिक शाळा माखणी येथे गुरुजी उशिरा आल्याने विद्यार्थी 8.15 वाजता मैदानावर खेळत होती)
🌟शिक्षक शाळेत वेळेवर हजर राहत नसल्याने विद्यार्थी सैरभैर🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परीषद शाळेतील गुरुजीचे अक्षम्य दुर्लक्ष शाळेची वेळ 7.20 वाजता गुरुजीने येणे गरजेचे होते परंतु आले 8.15 वाजता .म्हणून विद्यार्थ्यांना गुनवत्तेचे डोस पाजणारे गुरुजी असे करत असतील तर त्यांच्यावर शालेय व्यवस्थापन समितीने लक्ष देणे गरजेचे असते परंतु काही कारनाने लक्ष देणे नाही झाले तर पालकानी लक्ष देणे गरजेचे आहे उष्णता वाढल्यामुळे जिल्हा परीषद प्राथमिक शाळा माखणी येथे गुरुजी आले 8.15 वाजता शाळा भरणार होती 7.20 वाजता. गुरुजीची वाट पाहत मुले मैदानावर खेळण्याचा आनंद घेत होती.
💫उशिर झाल्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल - मुख्याध्यापक गंगाधर कानोडे
गंगाधर कानोडे मुख्याध्यापक जिल्हा परीषद प्राथमिक शाळा माखणी मी शाळेत वेळेत आलो माझे सह कारी काही जण वेळेत आले नाहीत. एक तास उशिर झाला यापुढे त्यांना उशिर झाल्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल असे गावातील नागरीकांना बोलताना सांगितले गुरुजीने कर्तव्य दक्ष राहिले पाहिजे अशी नामूसकी करू नये कारण सर्वांना त्याचा त्रास होतो.
0 टिप्पण्या