🌟राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे ३४ हजार कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित...!


🌟केंद्र शासनाच्या हिश्शापोटीचे आठशे कोटी रुपये न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने समजते🌟 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणारे तब्बल ३४ हजार कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पगारापासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या हिश्शापोटीचे आठशे कोटी रुपये न मिळाल्यामुळे कर्मचार्यांना पगार देता येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून एनएचमच्या कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात एनएचएमअंतर्गत विविध योजनांतर्गत डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, प्रयोगशाळा तज्ज्ञ अशा विविध पदांवर हजारो कर्मचारी काम करत आहेत. त्यांना राज्य सरकारमार्फत मानधन दिलं जातं. मात्र दोन महिन्यांपासून हे मानधन मिळालेलं नाही. आरोग्य विभागात दोन सचिव, आरोग्य आयुक्त तसेच अनेक बाबू मंडळी असूनही केंद्राकडून जो निधी मिळणे अपेक्षित आहे तो वेळेवर का मिळत नाही, असा सवाल डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर अडचणी येत नाहीत, असे वारंवार युतीच्या नेत्यांनी सांगितले. आरोग्य विभागाला मात्र उलट अनुभवाचा सामना करावा लागत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या