🌟तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून नागरिकांची पिळवणूक थांबवा - जगदीपसिंघ नंबरदार
तालुका भूमि अभिलेख कार्यालय येथे नागरिक विविध कामांसाठी येत असतात नागरिकांना सेतू सुविधा केंद्रमार्फत भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करावे लागतात व त्या नक्कल व कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी या कार्यालयामध्ये गरजेचे नाही. परंतु या कार्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र मार्फत त्यांना सदर कागदपत्रे आवश्यक मिळत नाहीत त्याकरिता सामान्य नागरिकांना संबंधित कार्यालयात वारंवार चकरा मारून संबंधित शाखेचे कारकून व अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन काम करून घ्यावे लागते असा आरोप नंबरदार यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी असे देखील नमूद केले आहे की संबंधित शाखेचे कारकून सिताराम मालकर व विजय ढोले हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असून त्यांच्यामुळे विभागाची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे........
0 टिप्पण्या