🌟युवा कीर्तनकर हभप.सोपान महाराज कनेरकर यांचे बुधवारी रात्री ९ ते ११ होणार किर्तन🌟
🌟जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज हभप.प्रशांत महाराज मोरे यांचे गुरुवारी सकाळी ११ ते १ होणार किर्तन🌟
🌟भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - प्रदीप खाडे
धारूर (प्रतिनिधी) :- कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर व दि.१ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.३ शके १९४७ गुरुवार दि.३० एप्रिल २०२५ रोजी लाखों युवकांचे प्रेरणास्थान, प्रखर विचारवंत, ख्यातनाम वक्ते, युवा कीर्तनकार ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर यांचे रात्री ९ ते ११ हरिकिर्तन होणार आहे. शुक्रवार दि.१ मे रोजी सकाळी ११ ते १ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. श्री हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणात किर्तनाचा कार्यक्रम होणार असुन यासाठी भव्य दिव्य वाॅटर प्रुफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. कै.शिवाजीराव खाडे हे आदर्श व्यक्तीमत्व होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे हे धार्मिक परंपरा जोपासत आहेत. आई - वडीलांच्या सेवेसारखे पुण्य कशातच नाही या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करत ते आपले कार्य करित आहेत. आपल्या वडिलांची मनोभावे त्यांनी सेवा केली. आपल्या वडीलांच्या स्मृती कशा जपाव्यात याचे उत्तम उदाहरण हे तिघे भावंड आहेत. त्यांच्यामुळे आज अध्यात्मिक वातावरण वाढत आहे.
कांदेवाडी येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भुतपुर्व शाखाधिकारी शिवाजीराव खाडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळी, आंबेजोगाई, बीड, घाटनांदुर व धर्मापुरी शाखेच्या व्यवस्थापकपदी त्यांनी काम केले होते.सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. रामायणाचे ते गाढे अभ्यासक होते. कांदेवाडी येथील पहिले पदवीधर म्हणून त्यांची विशेष ओळख होती. धारूरसह परळी वैजनाथ व परिसरात जुने ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणुन प्रसिध्द होते. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते. तसेच धार्मिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रासह अन्य कार्यात अग्रेसर म्हणून धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तीमत्व म्हणून कै.शिवाजीराव खाडे यांचे ओळख होती.
कांदेवाडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक,सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच परिसरातील भाविक भक्तांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी कांदेवाडी ता.धारूर (दिंद्रड येथून दक्षिणेस 5 किमी अंतरावर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रदिप शिवाजीराव खाडे (अध्यक्ष, कै.रामभाऊ आण्णा खाडे सेवाभावी संस्था, लातूर, अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कुमठा, तथा सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ), विलास शिवाजीराव खाडे, बालासाहेब शिवाजीराव खाडे व खाडे परिवार यांनी केले आहे......
0 टिप्पण्या