🌟बाधित क्षेत्राचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी🌟
परभणी (दि.०५ एप्रिल २०२५) :- परभणी जिल्ह्यात अचानकपणे झालेल्या वादळीवारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले.

माजी खासदार सुरेश जाधव यांनी जिल्हाधिकारी गावडे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की परभणी जिल्ह्यात सर्वत्र दि.०३ एप्रिल २०२५ रोजी अचानकपणे झालेल्या वादळीवारे व अवकाळी पाऊसासह काही प्रमाणात गारपीट देखील झाली यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे गहू,ज्वारी,करडई, फळबागा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे त्वरीत पंचनामे करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार तथा शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश रामराव जाधव पाटील यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्याकडे केली आहे......
0 टिप्पण्या