🌟शहरातील लिंगायत समाज बांधव व शिवपाठ परिवाराने मुख्याधिकारी यांना दिले निवेदन🌟
शहरातील लिंगायत समाज बांधव व शिवपाठ परिवाराच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पूर्णा शहरातील बसवेश्वर चौक या परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे कारण की दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी बसवेश्वर जयती साजरी करण्यात येत आहे. आणि गावातुन शांतता मिरवणुक पण काढण्यात येत असुन तसेच गावातील बाजारात दोन चाकी किंवा चार चाकी वहानावर ये-जे करणारे लोकांना सुध्दा त्या बसवेश्वर चौकातील अतिक्रमणाचा फार त्रास सहन करावा लागत आहे.
तरी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण बसवेश्वर चौक या परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात यावे.....
0 टिप्पण्या