🌟भूमि अभिलेख कार्यालयातील सर्व सेवा भू-प्रमाण केंद्रामार्फत आजपासून ऑनलाईन....!


🌟महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भू-प्रमाण ऑनालाईन सेवेचे केले उद्घाटन🌟

नागपूर :- भूमी-अभिलेख विभागाच्या सर्व सेवा भू-प्रमाण केंद्रामार्फत आजपासून ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शनिवार दि.०४ एप्रिल २०२५ रोजी ३० भू-प्रमाण ऑनलाईन सेवेचे उद्घाटन केले. 

राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नगर भूमापन अधिकारी वर्ग १ कार्यालयात हा कार्यक्रम जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख भूषण मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. भू-प्रमाण केंद्राच्या ऑनलाईन सुविधांमध्ये नागरिकांकरिता जागेचे मोजणी अर्ज, फेरफार अर्ज, वारस प्रकरणे, ऑनलाईन पद्धतीने भरल्याची तसेच मिळकत पत्रिका काढणे, सातबारा उतारा काढणे व फेरफार उतारा सुलभ पद्धतीने पुरविण्याची सुविधा या केंद्रामार्फत आजपासून उपलब्ध झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या