🌟कृषि विज्ञान केंद्रातर्फे हळद पिकातील उत्पादन वाढीच्या तंत्राच्या प्रात्यक्षिकाच्या प्रक्षेत्र दिनाचे आयोजन.....!


🌟डॉ.प्रशांत भोसले,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आयोजन🌟

भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली पुरस्कृत व जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी संचलीत कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्फत मौजे. मंगरुळ ता. मानवत जि.परभणी येथे दिनांक 15 एप्रिल, 2025 रोजी हळद पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुक्ष्म मुलद्रव्याचा वापर या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाच्या प्रक्षेत्र दिनाचे आयोजन डॉ.प्रशांत भोसले,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने हळद पिकातील उत्पादन वाढीसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कालीकत, केरळ येथील मसाला वर्गीय संशोधन केंद्रामार्फत तयार करण्यात आलेले सुक्ष्म मुलद्रव्याचा वापर याबाबतचे बाद्यरेषा पिक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले या आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकामध्ये मसाला वर्गीय संशोधन केंद्रामार्फत तयार करण्यात आलेले सुक्ष्म मुलद्रव्याचा हळदीच्या लागवडीनंतर 60 व 90 दिवसांनी वापर करण्यात आला. याच्या वापरामुळे पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन पिकाचा पिवळेपणा कमी झाला. 

या प्रक्षेत्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये या निविष्ठांचा प्रत्यक्षात वापर केलेल्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होईल असे प्रतिपादन केले. तसेच मंगरुळ येथील प्रगतशील शेतकरी श्री. अशोकराव देशमाने यांनी या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या वर्षी त्यांना एकरी 40 क्विंटल हळदीचे उत्पादन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.  

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. अमित तुपे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्व विशद केले. तसेच शेतकऱ्यांनी या सुक्ष्म मुलद्रव्याचा आद्रक व हळद या दोनही पिकात वापर करावा असे आवाहन केले. तसेच पढील वर्षीच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली......

सदरील कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या