🌟संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष निकालाकडे🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांपूर्वीच पार पडल्या आहेत. इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाली होती आणि मार्चमध्ये सर्व पेपर पूर्ण झाले आता संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी मे महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती परंतु यंदा दहावीचा निकाल १५ मे २०२५ पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद घोषित करण्यात येणारा निकाल ठरेल अशी माहिती समोर येत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना वेळेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा, यासाठी मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले होते. परिणामी निकालही वेळेत, म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.....
0 टिप्पण्या