🌟पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचाचे आरक्षण जाहीर : तालुक्यात महिलांसाठी ५० टक्के सरपंच पदे राखीव.....!


🌟सरपंचपद आरक्षण सोडतीत तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतचा समावेश🌟 

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवार दि.२२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पुर्णा तहसिल कार्यालयात जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार माधवराव बोधीकर व नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांनी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण करून जाहीर केले

 पुर्णा तालुक्यात सरपंचपद आरक्षण सोडतीत तालुक्यातील एकूण ७९ ग्रामपंचायतचा समावेश होता प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत करण्यात आली प्रवर्गनिहाय सोडलेल्या सरपंच पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी-१२,अनुसूचित जमातीसाठी-०१,नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी-२१ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी-४५ पदे आरक्षित करण्यात आली आहेत तर राज्य शासनाच्या २००९ च्या निर्णयानुसार  एकूण सरपंच पदांपैकी ५० टक्के पदे ही संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. तालुक्यांमध्ये ७९ ग्रामपंचायतच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले असून त्यापैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी काळात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये तालुक्याती १९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

             सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती(महिला) साठी कातनेश्वर, खरबडा, आडगाव, गोविंदपुर, संदलापूर, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी-२१ त्यामध्ये रेगाव,गौर,हिवरा, माखणी, आलेगाव, सोनखेड, मुंबई, गोळेगाव, सुरवाडी, कमलापूर, पिंपळगाव लोखंडे, कानेगाव, कावलगाव वाडी, नावकी, फुकटगाव, पिंपळगाव,शिरकळस,एकुरका,खटाळा,मजलापुर,खुल्या प्रवर्गासाठी-४५ त्यामध्ये २३ पदे महिलांंसाठी राखीव त्यामध्ये बानेगाव, दस्तापुर, पिंपळगाव, बाळापुर, बडबडी, देगाव , एरंडेश्वर, हटकरवाडी, कलमुला, लोण, महागाव, मजलापुर, सुहागन, आहेरवाडी, चांगेफळ, कात्नेश्वर लक्ष्मणनगर, पांगराढोणे, वाई धोत्रा, नरापूर, ताडकळस, खुल्या प्रवर्ग (पुरूष) - आडगाव, लासीन, हसदापूर, देऊळगाव, धानोरा काळे, कावलगाव, फुलकळस, ग्रुपला, माटेगाव, धानोरा मोत्या, चुडावा आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

          दरम्यान सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता गाव पातळीवर गप्पा रंगणार असून आगामी काळात निवडणूका होणार असल्याने राजकिय वातावरण तापणार आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या