🌟न्यायालयाचा सात वर्षांनी निकाल : दोषींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे🌟
ठाणे जिल्ह्यात १४ जुलै २०१६ रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. सुमारे एक वर्षाच्या तपासानंतर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक करण्यात आले होते. अश्विनी बिद्रे व अभय कुरुंदकर दोघेही विवाहित होते. हे दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले होते. ११ जुलै २०१६ च्या रात्री सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे ह्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुरुंदकर यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. याच दरम्यान हे दोघे एका वाहनाने बाहेर गेले. त्यावेळी या दोघांसह त्यावेळी राजू पाटील, कुंदन भंडारी, महेश फळणीकर हे त्या वाहनात होते. कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांचा गळा दाबून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी लाकुड कट करण्याच्या मशिनने बिद्रे यांच्या मृतदेहाचे बारीक बारीक तुकडे करुन पोत्यात भरले. व हे पोते समुद्राच्या खाडीत फेकुन दिले. तब्बल एक वर्षानंतर या प्रकरणाचा तपास करुन चौघांना अटक करण्यात आली. यापैकी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरवर अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करणे हे गुन्हे सिद्ध झाले आहेत. अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर दोन वर्षांनंतर शोधमोहिम राबवली जाते, पुरावे गोळा करण्यात तपास अधिकारी अयशस्वी झाले, असा उल्लेख करीत न्यायालयाने तपास यंत्रणाना फटकारले आहे. या प्रकरणात एकूण ८० साक्षीदार तपासले. तर, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा ११ एप्रिल रोजी सुनावण्यात येणार आहे......
0 टिप्पण्या