🌟अजेंटा एक्सप्रेस मधून प्रवाश्याचे सामान चोरीला🌟
नांदेड (दि.04 एप्रिल 2025) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे परिक्षेत्रात धावत्या रेलवे गाडीत चोरयांचे प्रमाण वाढले आहेत. छत्रपति संभाजीनगर येथील एका प्रवाश्याची लेडीज पर्स चोरीला गेली असून त्यात रोख बारा हजार रूपयासह अन्य कीमती सामान चोरी झाल्याची तक्रार नोंदविन्यात आली आहे.
वरील विषयी वृत्त असे की संभाजीनगर येथील रहिवाशी स. बलराजसिंघ गुरविंदरसिंघ छाबडा (वय 21 वर्ष ) रा. सिंधी कॉलोनी हे आपल्या कुटुंबिया सोबत दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी सिकंदराबाद येथून अजीन्टा एक्सप्रेसच्या बी 1 कोच मधून संभाजीनगर साठी यात्रा करीत होते. रेल्वेगाडी मध्यरात्री 12.10 वाजता (2 एप्रिल) सुमारास ज्यावेळी मुदखेड स्टेशन वर थांबली तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की कोण्या अज्ञात व्यक्तिनी त्यांचे एक गुलाबी रंगाचे लेडीज पर्स चोरी करून पोबारा केला. बैग मध्ये रोख बारा हजार रूपये होते. तसेच हेडफोन, गॉगल, नंबरचा चष्मा व इतर सामान होते. एकूण 16 हजार रूपये मूल्याचे सामान चोरीला गेले असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस (संभाजीनगर ) यांनी नोंद केली आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दखला केला असून लोहमार्ग नांदेड येथे तपास देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या रेलवे प्रशासनासाठी वाढत्या चोर्या गंभीर समस्या झाली आहे. धवत्या गाडीत चोर्या होत असून त्यासाठी जवाबदार कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहे......
0 टिप्पण्या