🌟गुरुद्वारा भाविकांना उच्चतम सुविधा द्याव्यात : जगदीपसिंघ नंबरदार यांचे प्रशासकांना साकडे🌟
श्री हजूर साहेब नांदेड : - देश-विदेशातून सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यात्री निवासमध्ये राहण्याची सुविधा देण्यात येते. या यात्री निवासांना विद्युत पुरवठा करणारा महावितरणचे रोहित्र मागील आठ दिवसापासून बंद झाल्याने भाविकांची होत असलेली गैरसोय दूर करून भाविकांना उच्चतम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शीख धर्मीयांची दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या गुरुद्वारा दर्शनासाठी जगभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सचखंड गुरुद्वारा बोर्ड कडून या भाविकांची गुरुद्वारा बोर्ड परिसरातील यात्री निवास, भाई मोनीसिंघ यात्री निवास व भाई दयासिंघ यात्री निवास येथे राहण्याची व्यवस्था करण्यात येते. या परिसरातील महावितरणचे रोहित्र मागील आठ दिवसापासून बंद असल्याने यात्री निवासची सर्व वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यामुळे त्यांची पर्यायी यात्री निवासांमध्ये व्यवस्था केली जात आहे. अति महत्त्वाचे भाविकांनी ॲडव्हान्स बुकिंग करून यात्री निवास आरक्षित केले जातात. परंतु त्यांना अपेक्षित सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक भाविकांना हॉटेल व लॉजमध्ये मोठा आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रशासकपदी डॉ. विजय सतबीरसिंग साहेब असतील किंवा नसतील तरीही दीर्घकालीन भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता बोर्डाकडून रणजीतसिंघ यात्री निवासचे निर्माण कार्य सुरू केले सदर काम गुरुद्वारा लंगर साहिब कार सेवावाले बाबा बलविंदरसिंग व बाबा नरिंदरसिंघ करित आहेत सदर काम अत्यंत संथ गतीने होत असल्याचे लक्षात आणून देत होल्ला मोहल्ला व डिसेंबर महिन्यातील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते गुरविंदरसिंघ बावा परिवार मुंबई यांना यांना शेकडो बुकिंग देण्यात येतात त्या कमी कराव्या तसेच पंजाब भवन यात्री निवास व एनआरआय यात्री निवासावर आणखी तीन ते चार मजल्यांचे बांधकाम करून अत्याधुनिक सुविधायुक्त रूम उपलब्ध करून देण्याची विनंती जगदीपसिंघ नंबरदार यांनी करीत एक दिवसासाठी येणाऱ्या भाविकांना गुरुद्वारा परिसरातच टिन शेड उभारून व्यवस्था करावी तसेच गुरुद्वारा बोर्डातील भ्रष्ट कर्मचारी आणि अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली केल्यास गुरुद्वारा बोर्डातील भ्रष्टाचार आळा बसू शकतो असे निर्णय घेण्यात यावेत असे नंबरदार यांनी प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांना दिलेल्या विनंती पत्रात केली आहे.....
0 टिप्पण्या