🌟सरदार गुरमीतसिंघ टमाना सर्वांना आवडणारा मित्र : जेष्ठ पत्रकार साहित्यिक स.रविंदरसिंघ मोदी



🌟गुरमीतसिंघ यांनी राजकारणात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली🌟


✍️
व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - लेखक स.रविंदरसिंघ मोदी 

नांदेड दक्षिणचे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सह-संपर्क प्रमुख असलेले स.गुरमीतसिंघ स्व. अर्जनसिंघ टमाना हे माझे बालमित्र. आंध्रसमिती इग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतल्यानंतर आम्ही भेटलो. शाळेला पायी चालत जाण्याची त्यावेळची एक व्यक्तिक मुभा होती आणि त्यामुळे साहजिकच आम्ही अनेक वर्षें मैत्रीत मुक्त वावरलो. तशा शालेय जिवनाच्या असंख्य आठवणी आहेत. 

राजकारण क्षेत्रात जवळपास 23 वर्षें व्यतीत करणाऱ्या गुरमीतसिंघ टमाना विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत असते. कारण, स्वभावाने सरळ, विनम्र, मनमिळाऊ, मीतभाषी असलेली ही व्यक्ती राजकारणात आलीच कशी? असा प्रश्न मला नेहमीच पडत असतो. त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती राजकारणात नव्हती हे मला ज्ञात आहे. विद्यार्थी दशेतही त्याला राजकारण क्षेत्राविषयी मुळीच रस नव्हते. अशा या व्यक्तिने केवळ आमदार आदरणीय हेमंत भाऊ पाटिल यांच्या मुळे सन 2002 साली एक साधा शिवसैनिक म्हणून राजकारणात पदार्पण केले हे सत्य आहे. त्यावेळी शिवसेना पक्ष अखंड होता.

शिवसेना नेते आणि माजी खासदार हेमंत पाटिल हेच गुरमीत सिंघ टमाना यांचे राजकीय गुरु म्हणा की एक सच्चा मार्गदर्शक मित्र. दरवेळी सुखादुःखात हेमंत पाटिल आणि प्रा.सौ.राजश्री ताई पाटिल सक्षमपणे त्याच्या पाठीशी असतात. म्हणून गुरमीतसिंघ याचा राजकीय प्रवास दोन दशकाहून अधिक काळ सुरळीतपणे सुरु आहे. सुरुवातीला अनेक वर्षें त्यांनी शिवसैनिक म्हणूनच जवाबदारी पार पाडली. नंतर हेमंत पाटिल यांनी गुरमीतसिंघ टमाना यास उप-शहर प्रमुख म्हणून नेमणूक दिली. वर्ष 2018 साली शिवसेनेच्या होटल मालक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सतत या पदावर पाच वर्षें काम केल्यानंतर जेव्हा शिवसेनेचे विभाजन झाले तेव्हा शिवसेना (शिंदे) गटाने त्यांना नांदेड (दक्षिण) जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख म्हणून जवाबदारी सोपवली. वरील जवाबदारी ते खंबीरपणे सांभाळत आहेत. परवा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार आदरणीय आनंदराव पाटिल बोंढारकर यांच्या विजयासाठी जिवतोडून प्रचारकार्य केले. श्री हेमंत पाटिल यांनी प्रचारनीती ठरवलेली होती त्याप्रमाणे प्रचार-प्रसार झाले. श्री आनंदराव बोंढारकर हे निवडून आले आणि विजयाचा हर्षोल्लास गुरमीतसिंघ आणि त्यांच्या मित्र परिवाराने मनापासून साजरा केला. 

गुरमीतसिंघ याने राजकारणात जरी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असली तरी सामाजिक जाणीवा पार पाडणारा तो एक कार्यकर्ता. लोकांच्या अडीअडचणीत उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची त्याची भावना असते. वयाच्या 23 व्या वर्षी आईला देवज्ञा झाली. तर वर्ष 2013 मध्ये वडील नावाचा आधार कोसळला. अशा घटनामुळे त्याचे शिक्षण जेमतेम स्नातक पर्यंत पोहचले. त्याने युवावस्थेपासून व्यवसाय स्वीकारलं आणि स्वतःच्या मेहनीतीवर त्याने कुटुंब उभा केला. हॉटेलचा व्यवसाय असो की जनरल स्टोरचा किरकोळ व्यवसाय, त्याने परिश्रमाने सर्वकाही साध्य केलं. शिवाय समाजसेवा देखील सुरु ठेवली.

मला आठवते, वर्ष 2021 मध्ये होळी सणाप्रसंगी घडलेल्या अनेक घटना मध्ये त्याने युवकांना धीर दिला होता. कोविड संक्रमण काळा दरम्यान देखील तो माझ्या सोबत संपर्कात होता. मी जरी एखादा उपक्रम सुरु केला तरी त्याचा त्यास पूर्ण पाठिंबा असतो. शालेयसोबती किंवा मित्र म्हणून गुरमीत सिंघ टमाना याच्याशी असलेल्या आत्मीय संबंधामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त हा लेख लिहिला आहे. तसा तो प्रसिद्धी पासून दूरच राहतो. त्याच्या कार्याची माहिती व्हावी अशी इच्छा होती म्हणून छोटा सा लेख रचला आहे. या लेखामुळे त्याच्या राजकीय, सामाजिक आणि मित्रत्व क्षेत्रात भरभराट होवो हीच सदिच्छा! 

- स. रविंदरसिंघ मोदी -

वरिष्ठ पत्रकार साहित्यिक तथा समाजसेवी नांदेड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या