🌟महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवुन दिले : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कु.अनुराधा सोळंकी व सौ.अलका चव्हाणची उत्तम कामगिरी🌟
चिखली : 17 व्या राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा भुवनेश्वर ओडीसा येथे दिनांक 28 ते 31 मार्च 2025 ला पार पडल्या यात महाराष्ट्र संघाने उत्तम कामगिरी केली यात आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन मुलींचा सहभाग होता शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कु.अनुराधा सोळंकी व सौ.अलका चव्हाण यांनी उत्तम कामगिरी करत महाराष्ट्रला कांस्य पदक मिळवुन दिले ही आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब व कौतुकास्पद गोष्ट आहे.
ह्या दोन्ही मुलींनी दिव्यंगत्वार मात करत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उमटवले आहे. अलका चव्हाण यांनी या यशाचे सर्व श्रेय कु.अनुराधा सोळंकी व सर्व सहकार्याना,घरच्यांना दिले व कु. अनुराधा सोळंकी यांनी हे श्रेय कोच संतोष शेजवळ सर,गणेश जाधव सर,पॅरा ऑलम्पिक महाराष्ट्रचे अध्यक्ष नंदकिशोर नाले सर, मुबारक सर , यांचे मनापासून धन्यवाद मानले तसेच कोल्हापूर जिल्हातील जानकी मोकाशी कांस्य पदक विजेती खेळाडु यांनी सर्व श्रेय अनुराधा सोळंकी यांना दिले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या