🌟महाराष्ट्र राज्यातील विज ग्राहकांच्या अपेक्षाभंगज्ञ : विज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती....!

 


🌟त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मिळालेला आनंद काही क्षणापुरताच राहिला🌟

मुंबई :- महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीन विज दर कपातीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिल्याने विज ग्राहकांच्या अपेक्षांवर विरजण पडले आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण (चडएइ) कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २८ मार्च २०२५ रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 

हा आदेश १ एप्रिल २०२५ पासून नव्या दरकपातीचा निर्णय लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे, आता महावितरणकडून करण्यात आलेल्या दरकपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मिळालेला आनंद काही क्षणापुरताच राहिला असून त्यांना पुन्हा लाईट बिलाचा शॉक बसलाय, असेच म्हणावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या