🌟राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने करण्यात आली नियुक्ती🌟
परभणी (दि.10 एप्रिल 2025) - परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा.डॉ. अरुणकुमार लेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनीलजी मगरे यांनी ही नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र पुणे येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले आले.
प्रा.डॉ. अरुणकुमार लेमाडे यापूर्वी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फादर बॉडीचे जिल्हा सरचिटणीस आणि एक वेळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. लायन्स क्लबचे दोन वेळा अध्यक्ष,मुप्टा प्राध्यापक संघटनेची मराठवाडा अध्यक्ष, जयक्टा संघटनेचे परभणी जिल्हा सरचिटणीस आधी पदे त्यांनी भूषवलेली असून सध्या ते येथील शासकीय स्त्री रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे कार्यकारी अध्यक्ष असून त्यांनी अनेक रुग्णांना या निमित्ताने मदत केली आहे. बुद्ध परिषदा, धम्मपरिषदा, आणि अनेक सामूहिक विवाह सोहळे आयोजनामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे.
विद्यार्थी दशे पासून चळवळीत ते अग्रेसर राहिलेले आहेत मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संसदेमध्ये ते विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. प्रा.अरुणकुमार लेमाडे यांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
या निवडीबद्दल परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश दादा विटेकर, शहराध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, रिपाईचे राज्य संघटक डी.एन.दाभाडे विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत, माजी नगरसेवक विशाल बुधवंत, एकताचे अध्यक्ष अजमत खान, लियाकत अन्सारी,अनिल गोरे,एडवोकेट लक्ष्मणराव बनसोडे, सुदाम तूपसमिंद्रे, जयप्रकाश इंगोले माधव कनकुटे, डॉ.तुकाराम भुक्तार, डॉ.बी.एस.खिल्लारे, भगवान कांबळे, डॉ.गौतम वाकळे,धनंजय रणवीर, रशीद मास्टर,आशरफ कादरी,छत्रपती मानवते, सोहन घोडे, रामराव सूर्यवंशी, गणेश वाघमारे, मधुकरराव परसोडे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.....
0 टिप्पण्या