🌟पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब.....!


🌟हिंसाचारी समाजकंटकांनी केली वडील-मुलाची घरात घुसून निर्घृण हत्या : केंद्रीय दले तैनात करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश🌟

🌟राक्षसी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी केलेल्या हिंसाचारात तीन ठार १५ पोलीस जखमी,११८ समाजकंटकांना अटक🌟

कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यात वक्फ सुधारणा विधेयकावरून राक्षसी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी हिंसाचाराचा नग्न तांडव सुरू केल्याचे निदर्शनास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात वक्फ सुधारणा विधेयक लागू करण्यात येणार नाही अशी घोषणा केल्यानंतर देखील समाजकंटकांकडून हिंसाचाराचा आगडोंब पसरवण्याचे कृत्य सुरुच आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवार दि.११ एप्रिल २०१५ पासून हिंसक घटना घडत असून त्यात राक्षसी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी एका घरात घुसून वडील,मुलाला ठार केल्याची अमानवीय घटना घडली दरम्यान या हिंसाचारात एकूण तीन जण ठार झाले आहेत. तसेच, १५ पोलीस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. याप्रकरणी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोलकाता उच्च न्यायालयाने मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दले तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोणत्याही स्थितीत राज्यात वक्फ सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

या बाबत भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने नमूद केले की, 'हिंसाचाराचे आरोप समोर येतात, तेव्हा न्यायालय डोळेझाक करू शकत नाही.' वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात मुर्शिदाबाद मध्ये पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अधिकारी यांनी केली होती. याचिकवेर सुनावणी करताना 'केंद्रीय दलांनी राज्यांशी समन्वय साधून काम करावे, असे कोलकाता उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

💫हिंसाचार प्रकरणातील ११८ समाजकंटकांना अटक :-

वक्फवरून पश्चिम बंगालमध्ये विशेषतः मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात शनिवारी हिंसाचाराचा उद्रेक झाला, मात्र कोणत्याही स्थितीत राज्यात वक्फ सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून हिंसक घटना घडत असून आतापर्यंत या प्रकरणी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे.

💫ममता बॅनर्जी यांनी केले शांततेचे आवाहन :-

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले. यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल राज्यातील सर्वधर्माच्या लोकांना माझे प्रामाणिक आवाहन आहे की, कृपया शांत राहा, संयम ठेवा. धर्माच्या नावाखाली कोणत्याही बेकायदेशीर वर्तनात सहभागी होऊ नका. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका, दंगली भडकवणारे समाजाचे नुकसान करत आहेत.

शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात एक इसम गोळी लागून जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. स्थानिक पोलिसांनी गोळीबार केलेला नाही, कदाचित बीएसएफकडून गोळीबार झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. समाजातील काही घटकांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने शनिवारी पुन्हा हिंसाचार घडला, अशा प्रकारच्या चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडू नका, हे समाजकंटकांचे काम आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

💫विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांनी केली एनआयए चौकशीची मागणी :-

दरम्यान विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून रेल्वेच्या मालमत्तेची जी नासधूस करण्यात आली त्याची चौकशी एनआयएमार्फत करावी अशी मागणी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या