🌟मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात....!

 


🌟अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली🌟

नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचा ताबा आज भारताला मिळणार आहे. सुरुवातीला दिल्ली नंतर त्याला मुंबईत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई येथे २६/११ २००८ रोजी मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेकडो निरपराध लोकांचा बळी गेला होता. दहशतवाद्यांनी सुरुवातीला मुंबईतील ताज, ओबेरॉय हॉटेलमध्ये मोठा धुडघुस घातला. त्यानंतर सीएसटी रेल्वे स्थानकात अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी अंदाधुंद गोळीबार केला. शेकडो सर्वसामान्यांप्रमाणेच हेमंत करकरे, अशोक कामटे,विजय साळसकर शशांक शिंदे आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्करातील मेजर संदीप उन्नीकृष्णन सारखे कमांडो शहीद झाले. तुकाराम ओंबळे या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने स्वतःच्या जीवाची बाजी लावून या हल्ल्यातील एक आरोपी अजमल कसाबला जीवंत पकडले होते. कसाबच्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले. याप्रकरणात प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीअंती अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घेतली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात तहव्वूर राणा हा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले होते. तो परदेशात लपून बसल्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने प्रयत्न केले होते.

अमेरिकेच्या न्यायालयाने राणाला मुंबई हल्ल्यातील थेट सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी, २००८ च्या मुंबई हल्ल्यातील सहभागासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राणा आणि हेडलीच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची परवानगी दिली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची पुष्टी केली. तहव्वूर राणाचे आज भारताकडे प्रत्यार्पण होत असून त्याला सुरुवातीला दिल्लीतील एनआयएच्या कोर्टात हजर केले जाईल. त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.......
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या