🌟परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : भूकंपाचा केंद्रबिंदू सांगोला🌟
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज बुधवार दि.०३ एप्रिल २०२५ रोजी तीन ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १९९३ च्या भूकं पाच्या आठवणी जुन्या लोकांनी जागवल्या.
मागील आठवड्यात थायलंड, बँकॉकसह आसपासच्या देशांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी झाली होती.
दरम्यान आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.६ रेक्टर स्केल अशी होती. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीतीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणासाठी धरणी कंप जाणवला. हा धरणी कंप म्हणजे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकँप्राचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू तीन वर्षांपूर्वी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या शब्द प्रयोगाने चर्चेत आलेले माजी आ. शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला या विधानसभा क्षेत्रात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकँप्राचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकँप्राचे केंद्र असते, सौम्य भूकँप्राच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरुन जातो. १९९३ साली लातूर जिल्ह्यातील - किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५६ मिनिटांनी - प्रचंड विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता ६.४२ रेक्टर स्केल एवढी मोठी होती......
0 टिप्पण्या