🌟या हल्ल्यात येमेनच्या सामान्य नागरिकांना कोणताही धोका पोहचला नाही असे कमांडने नमूद केले🌟
दुबई : अमेरिकेच्या हवाई दलाने काल शुक्रवार दि.१८ एप्रिल २०२५ रोजी येमेन देशाच्या तेल बंदरावर जबरदस्त हवाई हल्ले चढवले या हल्ल्यात ७४ जण ठार झाले असून १७१ जण जखमी झाले.
अमेरिकेच्या विमानांनी येमेन देशाच्या रास इसा तेल बंदरावर जोरदार हल्ला चढवला या हल्ल्याचा व्हिडीओ हुतीच्या बंडखोरांनी व्हायरल केला आहे अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडने सांगितले की हुथी दहशतवाद्यांना इराणकडून मिळणारा तेलसाठाच आम्ही उद्ध्वस्त केला आहे. कारण गेल्या १० वर्षांपासून ते या परिसरात दहशत माजवत आहेत. या हल्ल्यात येमेनच्या सामान्य नागरिकांना कोणताही धोका पोहचला नाही असे कमांडने नमूद केले.....
0 टिप्पण्या