🌟नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी आलेल्या भविकाचा १४ हजार रुपयांचा मोबाईल शेख रिजवानने केला परत...!


🌟रस्त्यात सापडलेला मोबाईल शेख रिजवान ने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोबाईल परत देऊन एक माणुसकीचा धडा निर्माण केला🌟

नांदेड (दि.२४ एप्रिल २०२५) : प्रमाणिकपणा हा आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी, अजुनही समाजामध्ये काही माणसं अशा चारित्र्याची आहेत जी इतरांसाठी आदर्श ठरतात असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी रविवार रात्री १०. ३० वाजता घडली शेख रिजवान है आपल्या घरी जात असताना छप्पन भोग स्वीट्स दुकानासमोर खाली पडलेला मोबाईल आढळल्यास मोबाईल हे सिख समाजाच्या व्यक्तीचे आहे असे त्या मोबाईल वर ठेवलेले फोटो ने स्पष्ट झाले असून शेख रिजवानने त्याचे मित्र इरफान मुन्ना यांच्याशी संपर्क करून मला भेटलेला मोबाईल हे सिख समाजाचे व्यक्तीचे असून मोबाईल ज्यांचे आहे त्यांना आपण परत करू फोन करून संपर्क साधला

यात्री हरदीपसिंघ रा. गुरदासपूर, पंजाब येथून श्री हजुर साहेब नांदेड येथे दर्शना साठी आले होते मोंढा येथील बाजारपेठामध्ये काही वस्तू खरेदीसाठी आले असताना त्यांच्या मोबाईल खिशातून खाली पडला त्यावेळी हरदीपसिंघ यांची बहीण फोन करत होती परंतु शेख रिजवान ला त्यांच्या बहिणीची पंजाबी भाषा मात्र त्यांना समजत नव्हती म्हणून इरफान मुन्ना यांच्या मदतीने सिख समाजाचे सामाजिक कार्यकर्ते स.मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन हरदीपसिंघ यांच्या बहिणीसी संपर्क करून दिला तेव्हा मनबीरसिंघ ग्रंथी ने गुरुद्वारा बोर्डाचे कार्यरत सेवादार तेजपालसिंघ शितल यांना बोलावून हा मोबाईल हरदीप सिंघ राहणार गुरुदासपूर पंजाब  यांचा आहे हा व्यक्ती दर्शनासाठी गुरुद्वारा येथे आल्यास त्वरित मला संपर्क करा तेजपालसिंघ शितल यांच्या भरपूर धावपळी नंतर यात्री हरदीपसिंघ रा. गुरदासपूर,पंजाब यांची भेट झाली हरदीपसिंघ यांना मनबीर सिंघ ग्रंथी यांच्या संपर्क कार्यालयात बोलून सुखरूप मोबाईल परत करण्यात आले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते स.मनबीरसिंघ ग्रंथी, इरफान मुन्ना, तेजपालसिंघ शीतल आदी उपस्थित होते मनबीरसिंघ ग्रंथी यांनी कर्तव्यदक्ष शेख रिजवान व मोहसीन खान यांना शुभेच्छा दिल्या प्रमाणिकपणाचे मनापासून आभार मानले हा प्रसंग नांदेडकरांसाठी प्रेरणादायीक ठरतो ज्यामध्ये माणुसकी प्रमाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या