🌟नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा येथे वैसाखी खालसा साजना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन....!


🌟वैसाखी निमित्त दि.१४ एप्रिल रोजी महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रमाचे देखील आयोजन🌟

नांदेड :- श्री हजूर साहेब नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे वैसाखी खालसा साजना दिवस च्या उपलक्ष मध्ये विविध धार्मिक समारोह हर्षोल्लासाने संपन्न होणार तसेच दि. 14/04/2025 ला महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रम होईल

दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही वैसाखी - खालसा पंथ साजना दिवस च्या उपलक्ष मध्ये तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम परंपरागत पध्दतीने हर्षोल्लासाने संपन्न होणार आहेत. यावेळी दि. 13/04/2025 रोजी सकाळी जवळपास 12:00 वाजता आदरणिय पंजप्यारे साहिबान तर्फे अमृत तैयार करुन इच्छुक अनुयायांना वैसाखी - खालसा पंथ साजना दिवस च्या दिवशी अमृतपान करुन अनुयायांना दिक्षा (अमृत ची दाद) देण्यात येईल तसेच परंपरागत पध्दतीने विविध धार्मिक कार्यक्रम, पुजा-पाठ इत्यादी केली जाईल. तसेच या दिवशी रात्री वैसाखी खालसा पंथ साजना दिवसाच्या उपलक्षात माननिय संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार साहिब व पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये व गुरुद्वारा बोर्डाच्या सहकार्याने तसेच दशमेश हजूरी सेवा सोसायटी, श्री हजूर साहिब, नांदेड यांच्या वतीने रात्री 08:30 ते 12:30 पर्यंत 15वां विशेष किर्तन दरबार चे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये पंथ प्रसिध्द किर्तनकार रागी भाई सुखप्रीत सिंघ जी व भाई गुरबचन सिंघ जी - दोन्ही हजूरी रागी श्री दरबार साहिब अमृतसर हे गुरुबाणी, किर्तन करुन भाविकांना निहाल करतील.

दि. 14/04/2025 रोजी वैसाखी सणा निमित्त परंपरागत महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रम धार्मिक नगर किर्तन सायंकाळी 04:00 वाजता तख्त साहिब येथून अरदास करुन आदरणिय सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी - जत्थेदार व माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्ती मध्ये आरंभ होऊन परंपरागत मार्गाने धार्मिक प्रवचन, किर्तन, भजन, नाम सिमरण करत हल्लाबोल चौक (फॉरेस्ट ऑफिस) येथे पोहचुन परंपरागत हल्लाबोल कार्यक्रम होईल तत्पश्चात हा महल्ला गुरुद्वारा बाऊली साहिब येथे पोहचुन व अल्प विश्रांती घेऊन परंपरागत मार्गांनी गुरुद्वारा नगीनाघाट साहिब येथे पोहचेल आणि रात्री 10 ते 10:30 पर्यंत तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब येथे पोहचुन समापन होईल तरी सर्व भाविकांना विनंती आहे की या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून गुरु महाराजांचे आशिर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या