🌟पुर्णा बसस्थानकाच्या सुधारणेसह प्रवासी सुविधांसाठी परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाने दिले निवेदन....!

 


🌟जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन🌟


परभणी/पुर्णा
:- परभणी-नांदेड-हिंगोली या तीन जिल्ह्यांना जोडणारा व परभणी-नांदेड या दोन जिल्ह्यांच्या मध्यभागी असलेला व तालुक्यातील तब्बल ९९ गावांना जोडणाऱ्या पुर्णा तालुक्यात अद्यापही प्रवाश्यांसाठी सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील असंख्य प्रवाशांना दळणवळणासाठी आपला जीव धोक्यात घालून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो सन सन १९९७/९८ या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते व परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष गिरीश बापट यांच्या प्रयत्नांतून पर्णा शहरात बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली खरी परंतु मुबलक प्रमाणात बसेसच उपलब्ध न झाल्याने या बसस्थानकाचे रुपांतर अक्षरशः ओस पडलेल्या भुतं बंगल्यात झाल्याचे पाहावयास मिळत आहे पुर्णा बसस्थानकाच्या झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रक यांच्याकडे तात्काळ सुधारणा करण्यासाठी निवेदन सादर केले या निवेदनावर काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  


परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात बसस्थानकाच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. प्रवाशांना बसस्थानकात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, तसेच स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचा मोठा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे असून निवेदनात प्रवासी हितासाठी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत 

🔴 मुख्य मागण्या

1. पूर्णा शहरातील बस स्थानकाचे तातडीने आधुनिकीकरण करावे.  

2. प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी.  

3. स्थानकातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून त्यांची नियमित स्वच्छता केली जावी.

4. प्रवाशांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि पुरेश्या बाकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

5. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी.

6. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासाची वेळ व माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावेत.

7. बस स्थानक परिसर नियमितपणे स्वच्छ केला जावा.

8. पालम, गंगाखेड, नांदेड, परभणी आणि उदगीर या मार्गावर नवीन बससेवा सुरू करावी.

9. महामंडळाची मोठ्या प्रमाणात जमीन पूर्णा शहरात उपलब्ध आहे.

10. पूर्णा तालुक्यात एकूण 96 गावे असून, परभणी आगाराची एकही बस पूर्णा शहरातून थेट कोणत्याही शहराशी जोडलेली नाही.

11. परिवहन महामंडळाच्या बससेवा उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

या निवेदनावर पूर्णा तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवे, जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी, जिल्हा सचिव सुनील ठाकूर, पूर्णा मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सदाशिव वाटळ, शहर संघटक पांडुरंग कदम, विश्वनाथ मोरे, रफिक सर, तात्याराव ढोणे  , अबुबकर युवक काँग्रेस,अमोल डाकोरे आदी पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत यावेळी निखिल धामणगावे यांनी सांगितले की, "पूर्णा शहरातील नागरिक आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी काँग्रेस सतत प्रयत्नशील आहे. जर १५ दिवसांत यावर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू."

🔴 परिवहन विभागाने तातडीने कारवाई करावी :-

परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाने प्रशासनाला जाहीर इशारा दिला आहे की, जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे आता परिवहन विभाग या मागण्यांना कसे प्रतिसाद देतो, याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या