🌟परळी नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन......!


🌟महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तात्काळ पगार करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी🌟    

परळी (प्रतिनिधी) - परळी नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काम बंदआंदोलन केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिकेतील स्वच्छतेतील रोजंदारी कर्मचारी यांची गेल्या तीन ते चार महिन्यापासून पगार न केल्यामुळे त्यांचे खूप हाल होत असून व नुकतीच रमजान ईद झाली परंतु नगरपालिकेने पगार न केल्यामुळे व आगामी 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे सदरील परळी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. 

तसे पाहता वर्षातून दोन-तीन वेळेस सदरील कर्मचारी हे पगारीसाठी काम बंद ठेवतात अशी ही माहिती देण्यात आली असून लवकरात लवकर तिन्ही महिन्याच्या पगारी करून कर्मचाऱ्यांची अडचण दूर करावी अन्यथा जोपर्यंत पगारी होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील अशी ही माहिती येथील रोजंदारी महिला व कर्मचारी यांच्या कांही प्रतिनिधीने दिली असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या