🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी राज्यातील पत्रकारांना सर्वतोपरी संरक्षण देण्याची मागणी केली🌟
परभणी - देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रसृष्टी व पत्रकारांवर सध्या महाराष्ट्रामध्ये धन दांडगे,गुंड प्रवृत्तीचे राजकारणी व वेगवेगळ्या गटातील माफियाकडून, आपल्या मनाजोगत्या बातम्या प्रसिद्ध न करता विरोधात वृत्त प्रकाशित केल्याबद्दल पत्रकारांवर जीव घेणे हल्ले ,खोट्या केसेस मध्ये डांबून ठेवणे ,त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढले असल्यामुळे पत्रकारांना जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावावे लागत आहे, महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू असूनही त्याची अंमलबजावणी योग्य रित्या होताना मात्र दिसून येत नाही व त्यात भर की काय सरकार आता ' विशेष जनसुरक्षा कायदा विधेयक ' आणु पाहत आहे, त्याचाही जास्त फटका पत्रकार व प्रसार माध्यमांना बसणार आहे, त्यासाठी हे विधेयक रद्द करण्यात यावे या व इतर समस्यांबाबत ,परभणीचे जेष्ठ पत्रकार तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन (बापू) कोल्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकारांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये, पत्रकारांना सुरक्षा मिळण्याची हमी , पत्रकारांसाठी विशेष ओळखपत्र, ग्रामीण भागातील पत्रकारांसहित सर्वांना अधिस्विकृती पत्रीका , प्रत्येक जिल्ह्यात मिडिया सेंटरची स्थापना, पत्रकारांसाठी विशेष कल्याण निधी, विमा योजनेची योग्य अंमलबजावणी, पत्रकारांवरील दाखल खोटे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र समितीचे गठण इ. मागण्यांचा समावेश असून ,सदरील निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तसेच पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आले असल्याचे मदन (बापू )कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे......
0 टिप्पण्या