🌟बिश्नोई टोळीमार्फत आपल्या हत्येचा प्रयत्न आमदार सुरेश धस यांच्या आरोपाने खळबळ....!


🌟हरणाचे मांस सेवन केल्याचा निराधार आरोप आपल्यावर केला जात🌟

बिड : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून रान उठविणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्यावतीने आपल्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. आपल्याविरोधात कट रचणाऱ्यांची माहिती आहे मात्र आपण कोणाचेही नाव घेणार नाही चौकशीतूनच ही नावे समोर येतील असेही आ.सुरेश धस म्हणाले हरणाचे मांस सेवन केल्याचा निराधार आरोप आपल्यावर केला जात असून, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आपली हत्या होईल असा दावाही त्यांनी केला आहे.

💫माझा काटा काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे :-

आ.सुरेश धस म्हणाले की खोक्या भोसले आणि आपले नाव जोडून आपल्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आपल्याविरोधात आंदोलन चालू आहे राजस्थानमधील बिष्णोई समाजाच्या लोकांना मुंबईत आणून माझ्याविरोधात वक्तव्ये करायला लावली जात आहेत हे सगळे बिष्णोई टोळीपर्यंत पोहचवून माझा काटा काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे असा आरोप आ.धस यांनी केला.

💫आपण माळकरी आहोत कधीही हरणाचे मांस सेवन केले नाही - आ.सुरेश धस

परळीवरून आलेल्या काहींनी खोक्याच्या आडून वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला खोक्या अमूक प्राण्याची शिकार करतो तो हरणाची शिकार करतो हरणाचे मांस सुरेश धसला पाठवतो धस हरणाचे मांस सेवन करतात अशी वक्तव्ये करण्यात आली आपण माळकरी आहोत कधीही हरणाचे मांस सेवन केले नाही आपल्याविरोधात मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चात २०० लोक होते ठरावीक लोकांचा गट त्यात सामील होता त्यानंतर त्यातले काही लोक मुंबईला गेले उपोषणाला बसले तिथे राजस्थानवरून बिष्णोई समाजाचे चार लोक आणले होते त्यांना आपल्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले असेही आ.धस म्हणाले.

💫आ.सुरेश धस यांचा रोख कोणाकडे ?

दरम्यान, यावेळी धस यांना विचारण्यात आले की तुमचा नेमका कोणावर आरोप आहे, तुमचा रोख कोणाकडे आहे, त्यावर धस म्हणाले,आपल्याविरोधात कट कोणी रचला आहे ते माहिती आहे परंतु आपण सध्या शांत आहोत बिष्णोई समाजातील लोकांना मुंबईत कोणी आणले, त्यांच्याशी संपर्क कोणी केला, त्यांची तिकिटे कोणी काढली ही सर्व माहिती आपल्याकडे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण पत्र देणार आहोत. बीडमधील राजकारण्यांचा यात हात आहे, कोणाचेही नाव घेणार नाही.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या