🌟राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करणाऱ्या महिलेच्या खंडणी प्रकरणी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची चौकशी...!


🌟त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता🌟

पुणे : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अश्लिल फोटो पाठवल्याचे आरोप करुन बदनामी करणाऱ्या त्या महिलेच्या खंडणी प्रकरणी सातारा पोलीसांनी आज बुधवार दि.०३ एप्रिल २०२५ रोजी एका सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याची सुमारे तीन तास चौकशी केली त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे आमदार तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोबाईलवर अश्लिल फोटो पाठवून छळ जयकुमार गोरे यांनी मोबाईलवर अश्लिल फोटो पाठवून छळ केल्याचा आरोप सातारा जिल्ह्यातील एका महिलेने केला होता. यासाठी त्यांनी विधिमंडळ अधिवेशन काळात मुंबईत उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. दरम्यान आरोप करणारी ही महिला काही दिवसानंतर जयकुमार गोरे यांच्या एका मित्राकडून दोन कोटीची खंडणी स्विकारतांना रंगेहाथ पकडली गेली. यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खिंडीत पकडून कानपिचक्या दिल्या होत्या. या प्रकरणात सातारा पोलीसांकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरी जावून सुमारे तीन तास चौकशी केली. यापूर्वी मंत्री गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आलेली आहे.....

💫पोलिसांना त्यांचा तपास करू द्या : या प्रकरणात मी आताच बोलणार नाही - ना.जयकुमार गोरे

प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. गोरे बोलताना म्हणाले, त्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलीस तपास सुरू आहे. त्याबाबत बोलण्याविषयी माझ्याकडे खूप काही आहे पण मी आता बोलणार नाही. अजून तपास सुरू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. त्यामध्ये जे काही आहे ते बाहेर येऊ द्या ते बाहेर आल्यानंतर मी त्या संदर्भात भूमिका मांडेल. आज पोलीस तपास सुरू आहे, त्यांना तपास करू द्या असंही ते पुढे म्हणालेत.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या