🌟याप्रकरणी पुढील सुनावणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात २९ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे🌟
छत्रपती संभाजीनगर :- परभणी येथील पोलिसी अत्याचारानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या कै.सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची विटंबणा केल्यानंतर उसळलेल्या दंगल प्रकरणी परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या विधीशाखेच्या तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलीसांच्या कस्टडीत असतांना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मोठी राजकीय खळबळ उडाली होती. याप्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने याप्रकरणी दोषी पोलीसांवर कारवाई व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची बाजू स्वतः ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज मांडली सुनावणी युक्तीवाद केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की न्यायालयाने आज याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीत विशेष तपास समिती नेमावी ही समिती राज्य सरकारने नव्हे तर न्यायालयाने नेमावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिली. याप्रकरणी पुढील उच्च न्यायालयात २९ एप्रिल २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
0 टिप्पण्या