🌟मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत मंगळवारी उडाला गोंधळ....!


🎓विद्यार्थ्यांना देण्यात आली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका🎓 

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत काल मंगळवार दि.०८ एप्रिल २०२५ रोजी गोंधळ उडाला परिक्षार्थी विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी हा प्रकार निदर्शनास आणून देताच त्यांना नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आली या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत विधी शाखेची परीक्षा घेण्यात येत आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या पाचव्या सत्र परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. या प्रकरणामुळे परीक्षा विभागाची गोंधळाची परंपरा कायम ठेवल्याचा आरोप युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केला आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या