🌟गुजरात राज्यातील बनासकांठातील डीसा भागात फटाका कारखान्यात भीषण स्फोट.....!


🌟भिषण स्फोटात १७ जणांचा जागीच मृत्यू : मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता🌟 

गांधीनगर : गुजरात राज्यातील बनासकांठातील डीसा भागात फटाक्याच्या कारखान्यात आज मंगळवार दि.०१ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भिषण स्फोटात १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हा स्फोट एवढा भीषण होता की मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

गुजरात राज्यातील बनासकांठातील डीसा भागात असलेल्या एका फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात कारखान्यातील भिंतींचं स्फोटांमुळे मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. टिनची शेड कोसळली आहे. आग मोठी असल्यानं धुराचे लोट निघत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकायला गेला. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याच्या एका भागाचं मोठं नुकसान झालं......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या