🌟जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या ०३ राक्षसी प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी....!

 


🌟राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी🌟

श्रीनगर :- जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम काल पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार करीत २८ पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या सहा राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यां पैकी तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून जारी करण्यात आले आहेत. एवढा मोठा हल्ला करुन दहशतवादी फरार होण्यात यशस्वी झाल्याने गुप्तचर यंत्रणांवर टीका केली जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील मिनी स्विर्झलँड समजल्या जाणाऱ्या बैसरना पर्यटनस्थळावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात देशातील विविध राज्यातील २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हा भाग नेहमीच संवेदनशील मानला जातो. या हल्लूयाचा तपास करणाऱ्या एनआयएने प्रत्यक्षदर्शीशी चर्चा केल्यानंतर तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र तयार केले आहेत. गुप्तचर अहवालातून असे दिसून आले आहे की एकूण सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाला भेट देवून उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले. लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना असलेल्या टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्लूयाची जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना या भागात पोहोचण्यास मदत केली. तसेच, कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तेच लोक स्थानिक भाषेत बोलत पुढे जात होते. आणि पाकिस्तानी दहशतवादी त्यांच्यासोबत बैसरना येथे पोहोचले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या