🌟देवेंद्रसिंघ मोटरवाले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने राज्य शासनाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले🌟
नांदेड :- गुरु-ता गद्दी सोहळा 2008 साठी सचखंड गुरुद्वाराचे विकास कामासाठी अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले होते त्यांच्या पुनर्वसनासाठी अबचलनगर सोसायटीचे निर्माण करून संरक्षण भिंतीसह शाळा,धार्मिक विद्यालय,क्रीडांगण, रुग्णालय व उद्यान निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने देवेंद्रसिंघ हजुरासिंघ मोटरवाले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने राज्य शासनाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरु ता गद्दी सोहळा 2008 च्या निमित्ताने सचखंड गुरुद्वाराचा विस्तार व विकास कामासाठी परिसरातील नागरिकांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. यामुळे विस्थापित 200 कुटुंबांना अबचलनगर वसाहत निर्माण करून संरक्षण भिंतीसह एक किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा, धार्मिक विद्यालय, रुग्णालय, क्रीडांगण व उद्यान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या सुविधा देण्यात न आल्याने गुरुद्वारा मॅनेजिंग कमिटीचे माजी सदस्य देवेंद्रसिंघ हजुरासिंघ मोटरवाले यांनी ॲड. महेश घाटगे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
सदर याचीकेवर उच्च न्यायालयाचे न्या. आर. जी. अवचट व न्या. संदीपकुमार मोरे यांचे खंडपीठासमोर सुनावणी झाली असता राज्याचे नगरविकास सचिव, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व भूमी अभिलेख अधीक्षक यांचे करिता राज्य शासनाने दिलेल्या सुविधा व क्रीडांगणाची जमिनी बाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी दि. 23 जून पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत........
0 टिप्पण्या