🌟गृहमंत्री अमित शहा रायगडावरुन घोषणा करतील अशी माहिती खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली माहिती🌟
गेल्या काही दिवसांपासून एका मागून एक महापुरुषांबद्दल वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे समाजात दुही निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथीत पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर, या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत कोरटकर सध्या तुरुंगात आहे मात्र, या घटनांवरुन सातत्याने तीव्र संताप होत असून छत्रपती घराण्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती. आता, लवकरच यासंदर्भात कायदा होणार असून स्वतः गृहमंत्री अमित शाह याची घोषणा करतील, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.......
0 टिप्पण्या