🌟विद्यार्थ्यांना शाळेत थंड पाण्याची व्यवस्था तसेच त्यांना हंगामी फळं आणि भाज्या खाण्यासाठी प्रोहत्सान द्या - शिक्षण विभाग
मुंबई : भारतात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असून महाराष्ट्र राज्यात देखील उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून हीट व्हेव अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून देखील २८ मार्च रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे.
या नोटीसीद्वारे शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळा या सकाळी ०७.०० ते ११:१५ पर्यंतच सुरू ठेवाव्यात हा नियम सर्व शाळांसाठी लागू असेल असं शिक्षण विभागानं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेत थंड पाण्याची सोय करा तसेच त्यांना हंगामी फळं आणि भाज्या खाण्यासाठी प्रोहत्सान द्या असं देखील शिक्षण विभागानं म्हटलं आहे. तेलंगणामध्ये देखील प्रचंड उष्णता आहे. तेलंगणाच्या शिक्षण विभागाकडून २४ एप्रिल पासून ११ जून पर्यंत शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे......
0 टिप्पण्या