🌟परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील नामांकित विधितज्ञ ॲड.रोहिदास निवृत्ती जोगदंड यांची नोटरी पदावर नियुक्ती...!


🌟ॲड.रोहिदास जोगदंड यांची नोटरी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟

परभणी :- परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील नामांकित विधितज्ञ ॲड.रोहिदास निवृत्ती जोगदंड यांची दि.०८ एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात झाली आहे पुर्णा तालुक्यातील गौर येथील भुमि पुत्र असलेले ॲड.रोहिदास जोगदंड हे एक अत्यंत अनुभवी वकील म्हणून परिचित आहेत त्यांनी वकिली क्षेत्रात कार्यरत असतांना अनेक आव्हानात्मक प्रकरणात न्यायालयासमोर परखडपणे बाजू मांडत अनेक निरपराधांना न्याय मिळवून देण्याची जवाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे ॲड.रोहिदास जोगदंड यांनी पुर्णा तालुका न्यायालय,परभणी जिल्हा सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील न्यायाची बाजू यशस्वीपणे मांडत निरपराधांना न्याय मिळवून देण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे दिवाणी फौजदारी  प्रकरणाबरोबरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अर्थात म.को.का. प्रकरणात सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केल्याचा अनुभव त्यांच्या नावावर आहे.

ॲड.रोहिदास जोगदंड यांना वकिली क्षेत्रातील तब्बल १६ वर्षांचा अनुभव असून ते नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या सन २००९ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत वकिली क्षेत्रासह धार्मिक/सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली असून एक निस्वार्थ व्यक्तिमत्त्व म्हणून ते संपूर्ण परभणी जिल्ह्यात देखील चिरपरिचित आहेत पुर्णा तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल दोन वेळा पद भुषविले असून ते सध्या पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेचे महामंत्री म्हणून कार्यरत आहेत ॲड.रोहिदास जोगदंड यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरी पदावर नियुक्ती करण्यात आली असून सतत पाच वर्षांसाठी नोटरी पदावर कार्यरत राहण्या संदर्भातील भारत सरकारचे व्यवसाय प्रमाणपत्र त्यांना दि.०८ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त झाले असून त्यांची भारत सरकारच्या नोटरी पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या