🌟परभणी शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अत्याधुनिक व सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन....!


🌟गरजवंत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.०१ एप्रिल २०२५) : परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडीया व परभणी सीपीई स्टडी चॅप्टर यांच्या वतीने अत्याधुनिक व सुसज्ज अशी अभ्यासिका सुरु करण्यात आली असून रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा सीए उमेश शर्मा यांच्या शुभहस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.

          परभणीतील विद्यार्थ्यांसाठी पुणे, मुंबई सारख्या महानगरांमधील अभ्यासिकेला असलेल्या सुविधा आता परभणीतील मध्यवस्तीमध्ये अत्याधुनिक वाय-फाय, वातानुकुलीत, लॉकर सुविधा तसेच प्रशस्त बैठक व्यवस्थेसह इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडीया व परभणी सीपीई स्टडी चॅप्टर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी सीपीई स्टडी चॅप्टरचे संयोजक सीए व्यंकटेश पांपटवार, सहसंयोजक सीए रोहित मंत्री, कोषाध्यक्ष सीए दशरथ भालके, सचिव सीए संतोष इंगळे यांनी केले आहे.

           याप्रसंगी परभणी सीपीई चॅप्टरच्या पुढील कार्यकारीणीची नियुक्ती सर्वानूमते करण्यात आली. यामध्ये संयोजक म्हणून सीए रोहित मंत्री, सहसंयोजक सीए कुशल गंगवाल, कोषाध्यक्ष सीए सौ. रेणुका इंगळे यांची निवड करण्यात आली. जेष्ठ सीए सिताराम गुंडलवार, सीए टी. एम. शहा, सीए प्रशांत काबरा, सीए अरविंद निर्मळ, सीए अरूण ओझा, सीए शाम धुत, सीए अनुप शुक्ला, सीए आशिष अग्रवाल तसेच नांदेड येथील सीए मॅनेजमेंट कमिटीचे पदाधिकारी यांनी ही अभ्यसिका उभारण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या