🏠प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थीना मिळणार ५० हजार रुपये वाढीव अनुदान🏠
त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत १० एप्रिलपर्यंत एक लाख ६० हजार ५४४ घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने ५० टक्के लाभार्थीची घरे अजूनही अपूर्णच असल्याबद्दल 'सकाळ'ने 'ऐंशी हजार घरकुलांना प्रतीक्षाच' या मथळ्याखाली खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्यावर प्रकाश टाकला होता. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार २६९ चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो.
0 टिप्पण्या