🌟या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी हे होते🌟
परभणी :- परभणी शहरातील मराठवाडा हायस्कूल या शाळेतून मार्च 1986 मध्ये इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या चाळीस विद्यार्थ्यांनी तब्बल 40 वर्षानंतर एकत्र येत येथील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूलमध्ये पुनश्च शाळा भरवली आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल अष्ठूरकर,द.ल.फडणीस, के.एस. सुरवसे, भास्करराव ब्रम्हनाथकर, बोबडे सर, श्रीमती रावस मॅडम, मुख्याध्यापक अनंत पांडे हे उपस्थित होते .1986 मध्ये मराठवाडा हायस्कूल मधून उत्तीर्ण झालेले 40 विद्यार्थी आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, वाणिज्य, संरक्षण, कृषी, उद्योग,पोलीस,नाट्य,न्यायालय आदि विविध खात्यामध्ये कार्यरत असलेले हे विद्यार्थी चेन्नई, गुजरात, पुणे, मुंबई, सातारा आदी भागातून त्या ठिकाणी आले होते. माजी विद्यार्थ्यांपैकी प्राचार्य संजय कांबळे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ. अलीम आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व 1986 च्या आठवणी आपल्या भाषणातून प्रगट केल्या. यावेळी बोलताना नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी यांनी मराठवाडा हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक कमावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. राष्ट्र निर्मितीसाठी स्थापन केलेली मराठवाडा हायस्कूल शाळा आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी पाहिल्यानंतर ज्या उद्देशासाठी ही शाळा स्थापन झाली ते राष्ट्र निर्मितीची स्वप्न साकार झाल्याचं दिसत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामप्रसाद खंदारे यांनी प्रास्ताविक अनुपमा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन अनिल पानसे यांनी मानले यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुजनांना भेटवस्तू देऊन सत्कार केला. या कार्यक्रमानंतर शहरा नजीक असलेल्या रिसॉर्टवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आले व हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचे निश्चित केले. या कार्यक्रमासाठी अनिल समिंद्रे, विष्णू सानप,सरोजा सोनावणे, सुनीता गायकवाड, जगदीश देशपांडे,कैलास गायकवाड आदींनी प्रयत्न केले.......
0 टिप्पण्या