🌟पुर्णेतील नालंदा नगरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त पंचरंगी धम्म ध्वजारोहन संपन्न....!


🌟ज्येष्ठ उपासक भीमराव बोधक यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहन करून महामानवास देण्यात आली मानवंदना🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरातील नालंदा नगर येथील सभागृहाच्या प्रांगणा मध्ये दि.14 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात ज्येष्ठ उपासक. भीमराव बोधक यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहन करून बाबासाहेबांना जयंती दिनी मानवंदना देण्यात आली. तक्षशीला महिला मंडळाच्या वतीने सर्वांना त्रिशरण पंचशील देण्यात आले. यावेळी प्रभाकर काशीदे ,भीमराव कदम, सुरेश खर्गखराटे, विश्वनाथ गवळी,अजय मोरे  (मुंबई ), जनार्धन वाघमारे, भीमराव कुऱ्हे, लक्ष्मण शिंदे,अनिल छडीदार, विशाल गवळी, प्रा. राहुल कांबळे, कपिल झिंजाडे, राजू बोधक आणि तक्षशीला महिला मंडळाच्या अध्यक्ष उपा. मीराबाई बोधक,शोभाबाई कांबळे,छायाबाई काळे,कल्पना बोधक, सोनल चंदनशिवे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धम्मपाल वाहीवळ यांनी केले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या