🌟कॅनडा देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांची निवड....!


🌟पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कार्नींनी मा.अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड,करीना गोल्ड,मा.संसद सदस्य फ्रँक बेलिस यांना पराभूत केले🌟

ओटावा : लिबरल पार्टीने रविवारी रात्री आपला नवीन नेता निवडला. कार्नी यांना ८५.९ टक्के मते मिळाली असल्याने मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान असणार आहेत त्यांनी जस्टिन ट्रुडोची जागा घेतली आहे.

 कार्नी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड, करीना गोल्ड, माजी संसद सदस्य फ्रँक बेलिस यांना पराभूत केले. कार्नी यांना संसदीय कामकाजाचा कोणताही अनुभव नाही. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा समाचार घेतला. ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कार्नी म्हणाले की,कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग बनणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या