🌟शेळके याने आक्रमक खेळ करीत पाटील याच्यावर ७ गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकावली🌟
अहिल्यानगर :- अहिल्यानगर येथे आयोजित ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला. शेळके याने आक्रमक खेळ करीत पाटील याच्यावर ७ गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकावली. या कुस्तीत पाटील याला अवघा एक गुण मिळविता आला. तो उपमहाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती जिंकल्यानंतर वेताळ शेळके याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. येथील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक लढतीला मैदानात तुतारी आणि हलगीचा निनाद घुमत होता.
0 टिप्पण्या